निमकर गुरुजी
आपला ज्योतिषी, आपला मार्गदर्शक

पंचांग स्वतः वाचायला शिका

तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. रोज कॅलेंडरमध्ये दिसणाऱ्या या गोष्टी सोप्या मराठीत, उदाहरणांसह. चिपळूणचे निमकर गुरुजी गेली ४० वर्षे हे काम करत आहेत.

मोफत · Online · मराठी

पंचांग कसे पहावे: मोफत परिचय सेमिनार

मंगळवार, ३ नोव्हेंबर, सकाळी १० वाजता
सुरू होण्यास0दिवस0तास0मिनिटे0सेकंद
मोफत नोंदणी करा

कोर्स आणि वर्ग

प्रत्येक बॅचमध्ये फक्त १० जण, जेणेकरून प्रत्येकाच्या प्रश्नाकडे लक्ष देता येईल.

लेव्हल १ नंतर तुम्हाला हे जमेल

  • रोजच्या पंचांगातलं शक, संवत्सर, मास आणि पक्ष ओळखता येणं
  • तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण म्हणजे काय हे सांगता येणं
  • प्रत्येक अंग किती वाजेपर्यंत आहे आणि नंतर काय लागतं हे वाचता येणं
  • क्षय तिथी, वृद्धी तिथी आणि भद्रा ओळखता येणं
  • आपल्या गावाच्या सूर्योदय-सूर्यास्तावरून राहुकाळ काढता येणं
पूर्ण अभ्यासक्रम पहा

निमकर गुरुजी

श्री. गजानन सिताराम निमकर गेली ४० वर्षे चिपळूण येथे ज्योतिष, कुंडली आणि पूजाविधी यांचं काम करत आहेत. पंचांग सोप्या भाषेत, उदाहरणांसह शिकवणं ही त्यांची खासियत.

श्री. गजानन सिताराम निमकर, UG12, सरोजिनी प्लाझा, आर्मी बॉईज हॉस्टेलसमोर, बुरूमतळी, चिपळूण

सुरुवात कशी करायची?

१. मोफत सेमिनार

एका तासात online पंचांगाची ओळख करून घ्या. मोबाईल नंबर आणि email ने नोंदणी करा.

२. लेव्हल १

दोन दिवसांत कोणत्याही दिवसाचं पंचांग स्वतः वाचायला शिका.

३. लेव्हल २

सण, व्रत आणि साधे मुहूर्त स्वतः ठरवायला शिका.

नेहमीचे प्रश्न

मला ज्योतिषाचं काहीच माहिती नाही, चालेल का?

हो. लेव्हल १ अगदी सुरुवातीपासून आहे. फक्त कोणतंही मराठी पंचांग किंवा कालनिर्णय, वही आणि पेन जवळ ठेवा.

सत्र चुकलं तर?

सत्राचं रेकॉर्डिंग तुमच्या लॉग इनमध्ये मिळेल.

एका बॅचमध्ये किती जण असतात?

जास्तीत जास्त १०, जेणेकरून गुरुजी प्रत्येकाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ शकतील.

शुल्क परत मिळतं का?

पहिल्या सत्राच्या ४८ तास आधीपर्यंत रद्द केल्यास पूर्ण शुल्क परत मिळतं.

संपर्क

UG12, सरोजिनी प्लाझा, आर्मी बॉईज हॉस्टेलसमोर, बुरूमतळी, चिपळूण

शुल्क परतावा आणि गोपनीयता धोरण