धोरणे आणि संमती
शुल्क परतावा आणि रद्द करणे
पहिल्या सत्राच्या ४८ तास आधीपर्यंत रद्द केल्यास पूर्ण शुल्क परत मिळेल. त्यानंतर शुल्क परत मिळणार नाही. बॅच आमच्याकडून रद्द झाल्यास पूर्ण शुल्क परत किंवा पुढच्या बॅचमध्ये जागा, जे तुम्ही निवडाल ते.
रद्द करण्यासाठी आम्हाला WhatsApp किंवा फोन करा. परतावा मूळ भरणा पद्धतीत ५ ते ७ कामाच्या दिवसांत जमा होतो.
गोपनीयता आणि संमती (DPDP कायदा २०२३)
- आम्ही फक्त नाव, मोबाईल नंबर, गाव आणि email घेतो.
- ही माहिती नोंदणी, वर्गाच्या लिंक, बीजक आणि तुम्ही संमती दिल्यास पुढच्या वर्गांची माहिती पाठवण्यासाठी वापरतो.
- तुमची माहिती आम्ही विकत नाही. भरणा, संदेश आणि ऑनलाईन वर्ग (Microsoft Teams) यांसाठी आवश्यक तेवढीच माहिती त्या सेवांपर्यंत जाते.
- WhatsApp वर STOP पाठवून किंवा प्रोफाइलमध्ये जाऊन संदेश कधीही बंद करता येतात.
- दिवसाला एकापेक्षा जास्त जाहिरातीचा संदेश पाठवत नाही.
तुमची माहिती पाहणं, डाउनलोड करणं किंवा काढून टाकणं हे तुमच्या खात्यातील प्रोफाइल पानावरून करता येतं.
नियम
- वर्गाचं साहित्य आणि रेकॉर्डिंग फक्त तुमच्या वैयक्तिक अभ्यासासाठी आहे.
- एका खात्यावर ठरावीक उपकरणांवरच लॉग इन करता येतं.
- हे वर्ग पंचांग समजून घेण्यासाठी आहेत. कोणत्याही परिणामाची हमी दिली जात नाही.
- सत्राची वेळ बदलल्यास आधी कळवू आणि रेकॉर्डिंग उपलब्ध करून देऊ.
मुख्य वेबसाईटवरील धोरणे: गोपनीयता धोरण · नियम · परतावा धोरण
प्रश्न असल्यास संपर्क: 9420378103 · info@nimkarguruji.com