प्रत्यक्ष वर्ग

पंचांग लेव्हल १ (प्रत्यक्ष वर्ग)

लेव्हल १ चा संपूर्ण अभ्यासक्रम एका दिवसात, गुरुजींच्या समोर बसून.

१ दिवस, ४ तास · चिपळूण कार्यालयात, ४ तास

₹१,७९९

पुढच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

पुढची बॅच कळवा

सोबत मिळेल

  • छापील पुस्तिका
  • तक्ते
  • चहा-नाश्ता
  • प्रमाणपत्र

कोर्सनंतर तुम्हाला हे जमेल

  • रोजच्या पंचांगातलं शक, संवत्सर, मास आणि पक्ष ओळखता येणं
  • तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण म्हणजे काय हे सांगता येणं
  • प्रत्येक अंग किती वाजेपर्यंत आहे आणि नंतर काय लागतं हे वाचता येणं
  • क्षय तिथी, वृद्धी तिथी आणि भद्रा ओळखता येणं
  • आपल्या गावाच्या सूर्योदय-सूर्यास्तावरून राहुकाळ काढता येणं

अभ्यासक्रम

दिवस १: काळाची ओळख, तिथी, वार, नक्षत्र

  • पंचांगाच्या पानावर कुठे काय असतं
  • शालिवाहन शक, ६० संवत्सरांचं चक्र, अयन, सहा ऋतू, बारा मास, अमांत आणि पौर्णिमांत फरक
  • तिथी: सूर्य-चंद्र अंतर, ३० तिथींची नावं, नंदा, भद्रा, जया, रिक्ता, पूर्णा, उदय तिथी, क्षय आणि वृद्धी तिथी
  • वार: सूर्योदय ते सूर्योदय, इंग्रजी तारखेशी फरक
  • नक्षत्र: २७ नक्षत्रे, स्वामी, जन्मनक्षत्र

दिवस २: योग, करण, वेळ वाचन, राहुकाळ, प्रॅक्टिकल

  • योग: सूर्य-चंद्र स्थानांची बेरीज, २७ योग, टाळले जाणारे ९ योग
  • करण: अर्धी तिथी, चर आणि स्थिर करणे, विष्टी म्हणजे भद्रा
  • वेळ वाचन: दिलेली वेळ म्हणजे संपण्याची वेळ, घटी-पळांचं रूपांतर
  • सूर्योदय, सूर्यास्त आणि आपल्या गावाचा राहुकाळ
  • प्रॅक्टिकल: प्रत्येकजण एका दिवसाचं पूर्ण पंचांग वाचून नमुना भरतो, गुरुजी तपासतात